अनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट

२१ कोटी ८० लाख नागरिकांना दरवर्षी नैसर्गिक आपत्तींचा (नॅचरल डिझास्टर) सामना करावा लागतो. सुमारे अडीच लाख नागरिक या नैसर्गिक आपत्तींमध्ये आपला जीव गमावतात, तर तब्बल ९३६ अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसानही नैसर्गिक संकटामुळे होत असते.

भारतात २००० सालापासून ते २०१७ सालापर्यंत तब्बल ७६ हजारांहून अधिक नागरिकांचा अशा नैसर्गिक आपत्तीत बळी गेला आहे. याशिवाय ४ लाख कोटी रुपयांचे (चार ट्रिलियन) आर्थिक नुकसान झाले आहे.

पूर, भूकंप, वादळ, त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्तीसंदर्भातील ही आकडेवारी हादरवून टाकणारी आहे. याशिवाय दंगली, बॉम्बस्फोट, आगी, अणुयुद्ध, रासायनिक व जैविक युद्ध अशा मानवनिर्मित आपत्तीसुद्धा आपल्यावर अचानक कोसळत असतात. वातावरणातील बदल आणि जागतीक घडामोडी बघता अशा नैसर्गिक आणि मानवी आपत्तीचे प्रमाण व धोका अधिकाधिक वाढत आहे. या आपत्ती आपण रोखू शकत नसलो, तरी या आपत्तीत जीवितहानी व होणारे नुकसान कमी करण्यासाठी आपण तत्पर राहणे आवश्यक ठरते. या नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांचा न डगमगता सामना करण्यासाठी प्रशिक्षीत असण्याची आवश्यकता आहे. यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले नागरिक अशा संकटात बचावकार्यात मोठे सहाय्यक ठरू शकतात.

‘अनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ (एएडीएम) आपत्तींचा सामना करण्यासाठी तत्पर असलेले असेच प्रशिक्षीत स्वयंसेवक आणि नागरिक घडवित आहे.

१४ मार्च २००२ मध्ये सद्गुरू अनिरुद्धांनी (बापू) या ‘अनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’च्या स्थापनेची घोषणा केली. ….घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते| या स्तोत्राचे प्रॅक्टिकल म्हणजे ‘एएडीएम’, असे बापू यावेळी म्हणाले होते.

१३ डिसेंबर २००१ साली दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर प्रत्येकाने आपत्तीव्यवस्थापनात प्रशिक्षित होण्याची आवश्यकता आहे हे ओळखून लगोलग ‘अनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ची उभारणी करण्यासाठी अहोरात्र कष्ट बापूंनी घेतले.

नैसर्गिक आणि मानवी संकटाच्या वेळी सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणारी स्वयंसेवकांची फळी उभारणे हा या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश आहे. धर्म, वंश, लिंग व इतर कोणताही फरक न करता आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यात धावून जाणारे आणि सरकारी यंत्रणांना सहाय्यभूत ठरणारे कार्यकर्ते घडविण्याचे काम ‘एएडीएम’तर्फे केले जाते. यासाठी संस्थेतर्फे संपूर्णपणे  मोफत प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत सुमारे ७३ हजार १९१ प्रशिक्षीत स्वयंसेवक संस्थेने तयार केले आहेत. त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर्स (डीएमव्हीज्) म्हटले जाते.

नैसर्गिक व मानवी संकटात आपला स्वत:चा बचाव करताना इतरांना कसे वाचवू शकतो, तसेच बचावकार्यातही कसे सहाय्यक ठरू शकतो, याचे प्रशिक्षण डिझास्टर मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये संस्थेतर्फे दिले जाते. विविध बचाव पद्धती, अग्निशमन यंत्रे, अग्निशमनाचे प्रकार, बँडेजेस, गाठी (Knots), उचलपद्धती (स्ट्रेचर्स) सी.पी.आर. (कार्डियो पल्मनरी रिसाक्शिटेशन म्हणजेच हृदय फुफ्फुसक्रियेचे पुनरुज्जीवन) इ. चे प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जाते. प्रात्यक्षिक व सराव सत्रांचेही आयोजन वेळोवेळी करण्यात येते. पहिल्या प्रशिक्षित बॅचमधील स्वयंसेवकांनी पुढील बॅचेसना प्रशिक्षण दिले व यातूनच ट्रेनर्स तयार करण्यात आले आणि हे ट्रेनर्स आता विविध ठिकाणी ह्या कोर्सचे आयोजन करतात.

‘एएडीएम’चे डीएमव्ही आपत्तीच्या काळात नेहमी सेवातत्पर असतात. यासाठी ‘एएडीएम’ केंद्रीय कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यात आली आहे. यामध्ये ‘डीएमव्ही’ ; चे नंबर व इतर आवश्यक माहिती संकलित आहे. एखाद्या भागात कोणती आपत्ती घडल्याची सूचना मिळताच आणि त्यासाठी स्थानिक यंत्रणेकडून मदत मागताच ही व्यवस्था कार्यरत होते. मोबाईल संदेश व इतर माध्यमातून या ‘डीएमव्ही’पर्यंत संदेश पोहोचविण्यात येतो. त्यानंतर ज्यांनां शक्य असेल ‘डीएमव्ही’ लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचतात व आपल्या मार्गदर्शकांच्या नेतृत्त्वाखाली सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहाय्य करतात.

एखादी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती येते त्यावेळी माजणारा गोंधळ नियंत्रित करणे, बघ्यांची गर्दी आवरणे महत्त्वाचे ठरते. किंवा एखाद्या सण उत्सवाच्या वेळी होणार्‍या गर्दीला शिस्तबद्धपद्धतीने नियंत्रित करणे महत्त्वाचे असते. अशा आपदप्रसंगी भेदरून चालत नाही, तर आहे त्या परिस्थितीत उपलब्ध साधनांचा उपयोग करून मार्ग कसा काढता येईल, याकडे लक्ष द्यावे लागते. मन शांत ठेवून एकाग्रवृत्तीने सेवाकार्यात झोकून द्यावे लागते. ‘एएडीएम’चे प्रशिक्षण अशाच प्रकारचे ‘डीएमव्ही’ घडविते.

* २६ जुलै २००५ रोजी मुंबईत ढगफुटीने हाहाकार उडाला होता. अवघ्या तासाभरात विक्रमी पावसाची नोंद झाली. कधीही पाणी न साठणारी ठिकाणेही पाण्याखाली गेली. मिठी नदीला पूर आला. धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने धरण क्षेत्रातील अनेक भागात एक दीड मजल्यापर्यंत पाणी वाढले. या आपत्तीच्या काळात ‘एएडीएम’च्या ‘डीएमव्हीज्’नी बचावकार्यात केलेल्या सहाय्याला तोड नाही.

प्लास्टिकच्या टाकून दिलेल्या हवाबंद बाटल्यांचे तराफे बनवून साठलेल्या पाण्यातून स्त्रिया, मुले, वृद्धांना सुरक्षित स्थळी पोहचविण्याचे काम त्यावेळी ‘डीएमव्हीज्’ नी केले होते.  काही भागात स्थानिक विक्रेत्यांना माल सुरक्षित जागी हलविण्यास ‘डीएमव्हीज्’ मदतही केली होती. तसेच पूरानंतर अनेक भागात आपद्‌ग्रस्तांना एएडीएमकडून कपडे व औषधांचे वाटप करण्यात आले. 

ह्या प्रसंगानंतर मुंबईचे नागरी अधिकारी मान्सून डिझास्टर प्लॅनची आखणी करण्यासाठी दरवर्षी एएडीएमला आमंत्रित करतात. पावसाळ्यात अशा आपत्तींच्या वेळी ‘एएडीएम’चे डीएमव्ही नेहमी मदतकार्यासाठी तत्पर असतात.

* साकीनाका, तसेच कुर्ल्यात दरड कोसळण्यासारख्या  भीषण घटनेत अग्निशामकदल व पोलिसदल यांना ‘डीएमव्हीज्’ नी मदत केली होती. मृतदेह बाहेर काढणे, जखमींना रुग्णालयात हलविणे, प्रथमोपचार करणे, घटनास्थळी जड, मोठे दगड हलविण्यासाठी ‘डीएमव्हीज्’नी सहाय्य केले.

* फेअरडील कॉर्पोरेशन (जोगेश्वरी) (२६ जानेवारी २००६), हंसा इंडस्ट्रियल इस्टेट (साकीनाका, मुंबई) येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत (६ जुलै २००६) पोलिसदलास व अग्निशामक दलास ‘डीएमव्हीज्’नी मदत केली.

* झवेरीबाजार-मुंबादेवी बॉम्बस्फोटात जखमींचे प्राण वाचवून त्यांना रुग्णालयात पोहोचविण्याचे काम ‘डीएमव्हीज्’ नी केले.

* ११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या पश्‍चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याचे, नोंदणी कार्यात व प्रथमोपचार स्टाफला मदत करण्याचे काम ‘डीएमव्हीज्’नी केले.

* २ डिसेंबर २००२ रोजी घाटकोपर व ६ डिसेंबर २००२ रोजी मुंबई सेंट्रल येथील बॉम्बस्फोटातही ‘डीएमव्हीज्’चा मदत कार्यात सक्रिय सहभाग होता.

विविध सार्वजनिक उत्सवांदरम्यान गर्दीचे नियंत्रण

१) गणपती विसर्जन व पुनर्विसर्जन –  मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणि  दरवर्षी सर्वाजनिक गणपती उत्सव दणक्यात साजरे होतात. या उत्सवात दिड, दोन, पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणपती विसर्जनाच्यावेळी चौपाट्या आणि विजर्सनांच्या इतर ठिकाणांवर मोठी गर्दी उसळते. या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी ‘एएडीएम’चे स्वयंसेवक अर्थात ‘डीएमव्हीज्’ मोठे योगदान देतात. पालिका यंत्रणा, पोलीस, अग्निशामक दल आदी सरकारी यंत्रणांना यासाठी सहाय्य करतात. मुंबई, ठाणे, पुणे यासह संपूर्ण राज्यात ५१ ठिकाणी ‘एएडीएम’ची ही सेवा चालते. या सेवेत ६ हजारपेक्षा जास्त ‘डीएमव्हीज्’ भाग घेतात. मुंबई, पुण्यात ‘डीएमव्हीज्’ करीत असलेल्या या सेवेचे कौतुक अनेक वेळा स्थानिक प्रशासन व यंत्रणांनी केले आहे. अगदी पहाटेपर्यंत विसर्जन पूर्ण होईपर्यंत ‘डीएमव्हीज्’ प्रमुख विसर्जन स्थळांवर उपस्थित असतात.

याशिवाय गणपती विसर्जनानंतर समुद्रांच्या लाटांबरोबर पुन्हा वाहून किनार्‍यावर आलेल्या गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जनही ‘एएडीएम’तर्फे केले जाते. मोठ्या प्रमाणावर या सेवेत दरवर्षी ‘डीएमव्हीज्’ सहभागी होत असतात. अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ ह्या संलग्नसंस्थेच्या सहाय्याने या सेवेचे आयोजन केले जाते. ‘डीएमव्हीज्’ काठावर लागलेल्या गणेशमुर्तींचे भग्न अवशेषही पुन्हा खोल समुद्रात विसर्जित करतात. संस्थेच्या या सेवाकार्याची प्रशंसा प्रशासनाकडून वारंवार करण्यात आली आहे.

२) ज्योतिबाचा वार्षिकोत्सव, कुंभमेळा, माऊंटमेरी जत्रा (वांद्रे), सज्जनगड दासनवमीच्या दिवशी भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण व वैद्यकीय मदत  ‘एएडीएम’च्या ‘डीएमव्हीज्’कडून केली जाते.

३) सिद्धीविनायक प्रभादेवी मुंबई, गणपतीपुळे (रत्नागिरी), सिद्धटेक (दौंड, पुणे) आणि सप्तश्रृंगी (वणी, नाशिक) येथे चैत्र व आश्‍विन नवरात्रीत सेवा, महालक्ष्मी मुंबई मंदिरात नवरात्रीत गर्दीवर नियंत्रण. तसेच लाईन  कंट्रोल, पाणी देणे, वैद्यकीय मदत करणॆ अशाप्रकारे पोलीस दल व स्थानिक प्रशासनास मदत करण्याचे काम ‘डीएमव्हीज्’ करतात. श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला विविध शिवमंदिरातील जत्रांमध्ये मुंबईत  व बाहेरगावी गर्दीवर नियंत्रण (बाबुलनाथ, महाबळेश्वरमंदिर, अंबरनाथ मंदिर अशा ११ ठिकाणी) ठेवण्य़ासाठी ‘डीएमव्हीज्’ मदत करतात.

४) मांढरादेवी वार्षिक जत्रा – २००५ साली सातार्‍याच्या मांढरादेवीच्या वार्षिक जत्रेत चेंगराचेंगरी होऊन जवळपास २५० भाविकांचा दुर्देवी मृत्यु झाला होता. त्यानंतर ‘डीएमव्हीज्’ येथे यंत्रणांना सहाय्य करण्याचे आणि लोटलेल्या गर्दीचे नियंत्रण करण्याचे काम केले होते. स्त्री व पुरुष डीएमव्हीज केलेल्या सहाय्याचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले होते. या दुर्देवी घटनेनंतर काही वर्ष मांढरादेवी जत्रेच्यावेळी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी ‘डीएमव्हीज्’ सहाय्य करीत होते.

६) जिजामाता उद्यान येथे आता मे २०१७ च्या सुट्टीच्या कालावधीत पेंग्विन पक्षी पहाण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे हे काम अनेक डीएमव्हीजच्या मदतीने प्रशासनाने केले.

७) इन्कम टॅक्स रिटर्न फाईलसाठी काही वर्षांपूर्वी गर्दीचे नियंत्रण करायला शासनाला मदत केली होती.

८) औरंगाबाद पैठण येथे नाथषष्ठीला गर्दीचे नियंत्रण करण्याची सेवा प्रत्येकवर्षी केली जाते.

याखेरीज शासनाने किंवा स्थानिक प्रशासनाने इतर कार्यक्रम आणि उत्सवाच्या ठिकाणी सहाय्य मागितल्यास ‘एएडीएम’ नेहमी सहाय्य करते.

पल्स पोलिओ लसीकरण

शासन मोहिमेअंतर्गत ६ वर्षांखालील मुलांना ठराविक कालावधीपर्यंत दर महिन्यातून एकदा पोलिओची लस दिली जाते. या लसिकरण मोहिमे साठी एएडीएम चे कार्यकर्ते आम्हाला उपलब्ध करून द्या अशी महानगरपालिकेने मागणी केली. त्याप्रमाणे उचित ती सेवा देण्यात येते. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई इ. ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग.

संस्थेतर्फे राबविले जाणारे कोर्सेस

१) बेसिक कोर्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट

२) फायर फायटर कोर्स

३) रेस्‌क्यू प्रॅक्टीसेस

४) कॉर्पोरेट कोर्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट

५) ट्रेनिंग कोर्सेस फॉर पोलिस डिपार्टमेंट (अशा कॉर्सचे आयोजन करण्याची विनंती केल्यास)

६) व्हर्मिकल्चर ट्रेनिंग

७) परेड ट्रेनिंग

या सर्व कोर्सचा कालावधी निरनिराळा असून हे सर्व कोर्सेस विनामूल्य आहेत.

कॉर्पोरेट सेक्टर ट्रेनिंग

धुळे, नंदुरबार येथे पोलिस महानिरीक्षकांच्या आमंत्रणानंतर पोलिसांसाठी खास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन संस्थेने केले होते. याशिवाय नंदुरबार जिल्हाधिकार्‍यांनी नंदुरबार व शहादा येथेही प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले होते. ‘बेस्ट’चे कर्मचारी तसेच नेव्हल डॉकयार्ड यांच्यासाठीसुद्धा प्रशिक्षण आयोजित केले होते. तसेच इतर अनेक संस्थांमध्ये अशाप्रकारच्या प्रशिक्षण शाळा तेथील प्रशासनाच्या विनंतीवरून आतापर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही त्यांच्या विनंतीवरून शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कोर्सेस राबविण्यात आले आहेत.

एएडीएम. चे पुस्तक

‘द टेक्स्टबुक ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ हे ऍकॅडमीने प्रकाशित केलेले पुस्तक तर सर्वांगसुंदर मार्गदर्शक पुस्तक आहे. आपत्ती म्हणजे काय? त्याची कारणे कोणती? त्यावर उपाययोजना कोणत्या? याचे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे. हे पुस्तक प्रथम इंग्रजीमधून एप्रिल २००२ मध्ये प्रकाशित झाले. जुलै २००२ मध्ये मराठी भाषेत हे पुस्तक प्रकाशित झाले. इंग्रजी पुस्तकाची दुसरी आवृत्ती डिसेंबर २००२ मध्ये व तिसरी आवृत्ती जुलै २००७ मध्ये प्रकाशित झाली. मराठी पुस्तकाची दुसरी आवृत्ती नोव्हे. २००८ मध्ये तिसरी आवृत्ती मार्च २००९ मध्ये व चौथी आवृत्ती जुलै २०१२ मध्ये प्रकाशित झाली.

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यामध्ये ‘एएडीएम’ योगदान देते.

व्हर्मिकल्चर (गांडूळखत)

संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास ५०० टन कचर्‍यातुन सुमारे ११० टन गांडुळखतात रुपांतर केले गेले व गरजू शेतकर्‍यांना याचे विनामूल्य वितरण करण्यात आले.

मध्य रेल्वे कार्यालय (मुंबई), सेबी (वांद्रे), नेव्हल डॉकयार्ड (कुलाबा), एफ. डी. सी (जोगेश्वरी), पोचखानवाला बँकर्स ट्रेनिंग कॉलेज (सांताक्रूझ), डी.आय.एल.लि. (ठाणे), भवन्स महाविद्यालय (अंधेरी), आय.ई.एस शाळा (मरोळ), मुंबई महानगरपालिकेच्या सर्व वॉर्डसच्या शाळा, या सर्व ठिकाणी एएडीएमकडून गांडूळखताबाबत प्रशिक्षण आयोजित केले गेले.

सध्या गांडूळखत प्रकल्प तुंगा इंटरनॅशनल हॉटेल (मरोळ, मुंबई) येथे व पिंपळेश्वर मंदिर (डोंबिवली ) येथे सुरु आहे. त्यासाठी एएडीएम ची टीम काम करते.

याशिवाय संस्थेचे अनेक स्वयंसेवक आपल्या घरीही छोटा गांडूळखत प्रकल्प राबवीतात. यातून निर्माण होणारे खत एकत्रित करून पुढे त्याचे वितरण केले जाते.

वृक्षारोपण

इतर संलग्न संस्थांच्या मदतीने डीएमव्ही हा प्रकल्प अनेक ठिकाणी राबवित असतात. गरज पडेल तिथे मदत करतच असतात. महाराष्ट्रात आतापर्यंत एएडीएमच्या मदतीने ६०,००० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

श्रीअनिरुद्ध उपासना फाऊंडेशन च्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्येही एएडीएम चे डीएमव्ही सेवा करतात. हे उपक्रम म्हणजे-

* अन्नपूर्णा महाप्रसादम योजना – ग्रामीण भागातील विद्यार्थी, कोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबीरातील गावकरी यांना भोजन वितरण

* इको फ्रेंडली गणेशमूर्ती – रामनाम वह्यांच्या कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती तयार करणे.

* रक्तदान शिबीर

* अनिरुद्धाज् बँक फॉर ब्लाईंडस – ऑडिओ कॅसेट्स व या सीडी तयार करून द्रुष्टिहिनांना विषय समजावून देणे व सीडी चे विनामूल्य दिल्या जातात

* चरखा योजना – सुताच्या लड्यांपासून युनिफॉर्म तयार करणे

* बारामास शेती पाणी चारा योजना

* रद्दी योजना

* जुने ते सोने योजना – जुने पण न फाटलेले कपडे, भांडी, पुस्तके, वह्या, खेळणी वगैरे वस्तू पुन्हा वापरण्यासारख्या असल्यास गरजू कुटुंबाला देणे.

* मायेची ऊब – गोधड्या बनवून गरीब, वृद्ध, लहान मुले, विद्यार्थी, स्त्रिया यांना देणे

* विद्या-प्रकाश योजना – ज्या विद्य्यार्थ्यांकडे  वीजेची सोय नाही त्यांना मेणबत्या व काडेपेट्या पुरवणे  .

अशा अनेक सेवांमध्ये डिएमव्ही भाग घेतात.

 

एएडीएम चे आगामी उपक्रम –

एएडीएम. चे विचाराधीन असणारे काही उपक्रम खालिलप्रमाणे  –

१) प्लॅस्टिकच्या वापरावर नियंत्रण व कायमस्वरूपी उपाययोजना

२) कुष्ठरोग व यावर्रील उपायांचे उचित मार्गदर्शन

३) एच.आय.व्ही, एड्सबाबत उचित माहिती व रोग टाळण्याच्या उपायाविषयी मार्गदर्शन

४) कारखान्यांमधील आपत्तींचा अभ्यास

२००२ साली सद्‍गुरु अनिरुद्धांनी पहिल्यांदा जेव्हा ‘एएडीएम’च्या स्थापनेची घोषणा केली होती. त्यावेळी हा ऍडव्हेंचर क्लब नाही. कोणतेही ऍडव्हेंचर करण्यासाठी ह्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले होते.

आज जगभरात घडणार्‍या घटना, नैसर्गिक आणि मानवनिर्मित विनाशकारी आपत्तींची वाढलेली तीव्रता पाहता प्रत्येक नागरिक येणार्‍या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज असणे अत्यंत आवश्यक बनले आहे. अनेकवेळा आपत्तीपेक्षा भयंकर उत्पाद माजवतात त्या आपत्तीनंतर येणार्‍या रोगराई, भीतीने होणारी चेंगराचेंगरी. काही वेळा एखादी घटना घडल्यावर नक्की काय करायचे हे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना ठाऊक नसल्याने आपत्तीची तीव्रता वाढते. अशावेळी जास्तीजास्त जण आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षीत झाले, तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे भविष्यात येऊ घातलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी प्रत्येकाने …घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते| या स्रोत्राचे प्रॅक्टिकल असलेला हा कोर्स करणे नितांत आवश्यक बनले आहे व हे ऍडव्हेंचर नाही, तर काळाची आवश्यकता आहे, हे सुद्धा लक्षात ठेवलले पाहिजे. 

एएडीएमसाठी संपर्काचा पत्ता पुढीलप्रमाणे –

‘अनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’

३, कृष्ण निवास, पहिला मजला

सखाराम कीर मार्ग, ऑफ एल.जे.रोड

शिवाजी पार्क माटुंगा (प)

मुंबई – ४०००१६

फोन नं (०२२) २४३०१०१०, (०२२) २४३०२४२४

ईमेल : [email protected]

वेबसाईट : www.aniruddhasadm.com